दुरुन दिसणाऱ्या डोंगरांगा, आजूबाजूला बहरलेली वनराई, पाठीमागे वाहणारी घामावती नदीचे छोटे पण खळखळ वाहणारे पात्र अशा निसर्गरम्य परिसरात वसलेले हे चालुक्यकालीन महादेव मंदिर. मंदिराचा बाह्यभाग जरी जीर्णोद्धारीत असला तरीही आतील बाजूस कलेचा अप्रतिम आविष्कार घडतो. मंदिराच्या स्तंभांवर अप्रतिम कलाकुसर केलेली दिसून येते. नारायण, गणेश, भैरव, श्रीकृष्ण इ. देवतांसोबतच काही मिथुनशिल्पही मंदिराच्या स्तंभांवर अंकित असलेले दिसून येतात. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, सभामंडप व मुखमंडप याप्रमाणे असून प्रत्येक भागावर असणारे छत हे घुमटाकार आहे. गर्भगृहात साधारणतः ५ फुटाची शिवपिंड आहे. एकंरीतच मंदिर आणि आजूबाजूचे वातावरण मनाला मंत्रमुगध करणारे असे आहे.
खडकेश्वर महादेव मंदिर, जामखेड, ता. अंबड, जि. जालना
May 27, 2023
0






