‘शिल्पसाधना’ या ब्लॉगचा हेतू आपली वैभवसंपन्न अशी भारतीय शिल्पकलेचा परिचय करुन देणे आणि स्थापत्यातील पायाभूत घटक असलेल्या लयन व मंदिर स्थापत्य आणि त्यावरील शिल्पकला त्यातील बारकावे म्हणजे मंदिरांचे अवयव कोणते? प्रकार कोणता? त्यावरील अंकित शिल्प व प्रतीक कोणती? या प्रतिक व प्रतिमांचा अर्थ काय ? मंदिर व शिल्पनिर्मितीचे एक शास्त्र आहे. त्यांच्या प्रयोजनामागे काही अर्थ आहे. लेण्या आणि मंदिरांवर अंकित केल्या जाणाऱ्या मूर्त्यांच्या निर्मितीमागे काही कथा आहेत. मूर्ती आणि त्यावरील प्रतीकांनाही विशिष्ट अर्थ आहे. या लेखमालेतून उपरोक्त गोष्टींची थोडक्यात व सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण माहिती ही लोकांपर्यंत पोहचावण्याचा माझा उद्देश्य आहे.
यासोबतच एकंदरीतच शिल्प या व्यापक शब्दांतर्गत येणारी स्थापत्यशिल्प, मंदिरशिल्प, मुर्तिशिल्प, दुर्गशिल्प, चित्रशिल्प आदी पुरातत्त्वीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन व अपरिचित आणि रोचक माहिती इतिहास व पुरातत्त्व प्रेमी वाचकांसमोर मांडणे आणि यावर चर्चा होऊन नवनवीन गोष्टींचा उलगडा होऊन मलाही अज्ञात असलेल्या गोष्टींची माहिती व्हावी व त्यावर संशोधन करणे शक्य व्हावे, हाही या लेखनाचा एक हेतू आहे.
मी स्वतः संशोधन क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक स्थळांना मी प्रत्यक्ष भेटी देतो. त्यामुळे शिल्पसाधना या ब्लॉगवर दिली जाणारी माहिती ही माझा प्रत्यक्ष अनुभव त्यावर मी केलेले संशोधन आणि त्यातून मला उमजलेजी मते व अभ्यास मी येथे मांडतो. केलेल्या संशोधनास संदर्भ व इतर अभ्यासकांची मते व संशोधनाचा अंतर्भावही माझ्या लेखनात मी करतो. मी केलेले लेखन हे माझे संशोधन असल्यामुळे ‘शिल्पसाधना’ आणि त्यावरील लेख, छायाचित्रे, रेखाचित्रे तसेच इतर साहित्य यांविषयीचे सर्व हक्क माझ्याकडे अर्थात संकेतस्थळ धारकाकडे राखिव असून कोणत्याही व्यक्तीला ‘शिल्पसाधना’ या संकेतस्थळावरील गोष्टींचा माझ्या परवानगीशिवाय वापर करता येणार नाही. वापरण्यात आलेली छायाचित्रे, रेखाचित्रे (जे photos मी स्वतः स्थळांना भेटी देऊन काढले आहेत, किंवा जी रेखाचित्रे मी स्वतः तयार केली आहेत) त्यावर माझा copywriter टाकण्यात आला आहे.
परवानगीसाठी, नवीन संकल्पनांसाठी किंवा आपल्या सूचना वा प्रतिक्रियांसाठी आपण contact section चा उपयोग करुन किंवा माझ्या दिलेल्या सोशल मिडिया हेंडल्सद्वारा संपर्क करून आपले विचार माझ्यापर्यंत पोहचवू शकता.
धन्यवाद