कुस्तीची वा मल्लयुद्धाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भारतात वैदिक वाङ्मयात, तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथांत मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगी येतो. प्राचीन मंदिरांवर विविध ठिकाणी मल्लयुद्धाचे अनेक प्रसंग अंकित असतात. वाली-सुग्रीव द्वंद प्रसंग बऱ्याच मंदिरांवर कोरलेला दिसून येतो. गुजरात मधील मोढेरा येथील सुर्य मंदिराच्या एका स्तंभावर कोरलेल्या या प्रसंगात एक नायक तीनचार मल्लांना एकाच डावात नमवत आपले शक्तीप्रदर्शन करत आहे. हे अंकन पाहतांना action मध्ये हा प्रसंग नेमका कसा असेल, याचे साम्य दर्शवणारे दृश्य हे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या 'मेरी जंग - दी वन मॅन आर्मी' या चित्रपटातील एका दृश्याप्रमाणे भासते.

